Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

गोष्ट विणलेल्या धाग्यांची

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर एक विनोदी पोस्ट फिरत होती. त्या पोस्टमध्ये पती-पत्नीचा संवाद होता. "पती- अगं, मी तुझ्यासाठी नवी साडी आणली आहे. बघ तरी जरा. पत्नी – (खूष होऊन) अय्या खरंच ? खूप सुंदर आहे पण या रंगाची आणि डिझाईनची साडी आहे माझ्याकडे. कुठून आणली ? पती : तुझ्याच कपटातून आणली. घडी न मोडलेली आहे." बायकांसाठी साड्या हा जिव्हाळ्याचा विषय तर, पुरुषांसाठी चेष्टेचा विषय ठरलेला आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी ‘साडी नाहीच’ हे महिलांचे वाक्य ठरलेले. पण ह्या "साडीत" विशेष असं आहे तरी काय? साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार आहे. साडी नेसायला अ‌वघड असली तरी, संपूर्ण जगात तिच्याबद्दल अपार उत्सुकता असते. जे वस्त्र नेसल्यावर स्त्री सुंदर, आकर्षित आणि मोहक दिसते, ती म्हणजे साडी. साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरुन निर्माण झाला आहे. शाटिका म्हणजे चौकोनी आकाराचे लांब वस्त्र. भारतात साडी नेसण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगातील सर्वात जुन्या वस्त्रांपैकी एक वस्त्र म्हणून ही ओळख आहे. साड...