Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

एक तरी वारी अनुभवावी

"ऐक." "बस इथे." "आता किमान पंधरा - वीस दिवस बाहेर असणारेस." "तिथे अजिबात चिडचिड करायची नाही. कोणावर ओरडायचं नाही. दोघे सोबत राहायचं. जपून राहायचं. सांभाळून राहायचं." समोर बसवून आईने, आजीने आणि बाबांनी हा उपदेश दिला. पण मी मात्र पुन्हा वारीला जाणार ह्याचं विचारामध्ये गुंग होते. मागच्या वर्षी वारीचा एक टप्पा कव्हर करता आला पण ह्यावर्शी मात्र पूर्ण वारी कव्हर करायला मिळणार ह्याचा आनंद, उत्साह आणि हुरहूर होती. देहू आणि आळंदी ते पंढरपूर असा साधारण २०० ते २५० कि.मी. चा पायी प्रवास. ज्ञानदेव, तुकोबाचा जयघोष करीत तो लाखोंचा जनसमुदाय चालत निघतो. कुणी डोक्यावर बाचकी घेऊन, कुणाच्या गळ्यात टाळ- वीणा-मृदुंग, तर कोणाच्या माथ्यावर तुळशी वृंदावन ! राम कृष्ण हरी चा मंत्रघोष तर निरंतर सुरूच. एका मार्गाने ज्ञानदेवांची पालखी, तर दुसऱ्या मार्गाने तुकोबांची. या दोन संत श्रेष्ठांबरोबरच इतरही अनेक ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. वारी ही आपल्याला लाभलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म...